भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी– मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रथमच मराठी भाषा विभागातर्फे विविध स्पर्धा आयोजित करत आहे. भारताबाहेरील रहिवासी या उपक्रमात समाजमाध्यमांद्वारे सहभागी होऊ शकतात.

पात्रता : विदेशातील (भारताबाहेर स्थित असलेले/NRI) नागरिक.

(भारतात स्थित असलेल्या नागरिकांसाठी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल)

स्पर्धेचे स्वरूप

मराठी भाषेबद्दल खालील स्वरूपात स्पर्धकांना आपले नामांकन देता येऊ शकते –

फेसबुक पोस्ट –

चलचित्रफित/video : कमीत कमी एक मिनिट व जास्तीत जास्त दोन मिनिटांमध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफित/व्हिडिओ

निबंध : 1000 ते 1500 शब्दात मराठी भाषेबद्दल निबंध

ट्विटर –

चलचित्रफित : ट्विट स्वरूपात कमीत कमी एक मिनिट व जास्तीत जास्त दोन मिनिट मध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफित/व्हिडिओ

ट्विट : मराठीबद्दल एक ट्विट

परकीय भाषा – स्थानिक नागरिक तेथील आंतरराष्ट्रीय भाषेतसुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मराठी भाषेबद्दल विदेशी नागरिक त्यांच्या मातृभाषेत संदेश देऊ शकतात. चलचित्रफितीस इंग्लिश किंवा मराठी उपशीर्षक (subtitles) देणे आवश्यक असेल. (उदाहरणार्थ : फ्रेंच भाषेतील व्हिडिओला  उपशीर्षक (subtitles) असणे अपेक्षित आहे)

स्पर्धा कालावधी : १० मार्च २०२१ ते १० एप्रिल २०२१

निकाल घोषणा :

१ मे २०२१ (महाराष्ट्र दिन) –दूरदृष्यप्रणाली (online) कार्यक्रमाद्वारे बक्षीस समारंभ

कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व्यवस्थित झाले तर न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन डीसीमध्ये बक्षीस समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

विशेष प्रमाणपत्र :

परकीय भाषेमध्ये मराठीचे महात्म्य सांगणाऱ्या स्पर्धकांना विशेष पुरस्कार देण्यात येईल

विदेशातील विविध मराठी मंडळ/संस्था या प्रकल्पात सहभागी होऊ शकतात, त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमद्वारे (social media) या स्पर्धेची जाहिरात केली व 20 स्पर्धक प्रेरित केले तर त्यांना विशेष प्रमाणपत्र १ मे २०२१ रोजी देण्यात येईल

विदेशात प्रचार आणि प्रसारासाठी विशेष स्वयंसेवकांची गरज आहे व सर्व स्वयंसेवकांना विशेष प्रमाणपत्र देण्यात येईल

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल, प्रमाणपत्रावर हवे असणारे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

नियम व अटी :

मराठी भाषेत किंवा मराठी भाषेबद्दलच पोस्ट/ट्विट असणे अपेक्षित आहे

सर्वात जास्त likes/comments आणि retweet झालेल्या व्यक्तीच बक्षीस पात्र असतील

कमीत कमी १० like आणि ५ retweet मिळालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल

स्पर्धेस पात्र असलेली फेसबुक पोस्ट आणि ट्विट सर्व लोकांना दिसेल अशी व्यवस्था (privacy setting) मध्ये करून ठेवणे आवश्यक आहे (पारदर्शकतेसाठीही खूप महत्त्वाची बाब आहे)

स्पर्धकांनी विवादास्पद तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास त्यांची पात्रता रद्द करण्यात येईल स्पर्धेमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मराठी भाषा विभागाकडे राखीव असतील. मराठी भाषा विभागाचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहिती – http://www.marathi.gov.in/nri

विदेशातील मराठी मंडळांसाठी तसेच व्यक्तिगत स्पर्धकांसाठी न्यूयॉर्क तसेच वॉशिंग्टन डीसी शहरात मार्च व एप्रिल मध्ये निःशुल्क कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

संपर्क : अभिषेक सूर्यवंशी abhishek.nricoordinator@marathi.gov.in.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web