कल्याण मध्ये वंचितचे काळया शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन

कल्याण प्रतिनिधी– श्रद्धेय बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काळा शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानुसार कल्याण तहसील येथे 5 मार्च रोजी असलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेले कृषी काळे कायदे रद्द करण्यात यावे यासाठी जोरदार धरने आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे जिल्हा उपाध्यक्ष जे.जे.मानकर, जिल्हा महासचिव रेखाताई कुरवारे,कल्याण पुर्व -पश्चिम अध्यक्ष मनोज धुमाळ , संतोष गायकवाड, डोंबिवली पूर्व-पश्चिम अध्यक्ष सुरेंद्र ठोके ,गौतम गवई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे प्रतिक साबळे,इंजि.रूपेश हुंबरे , कमलेश उबाळे , तसेच वंचित चे राजाभाऊ त्रिभुवन,ज्योतिराम जावळे देवानंद कांबळे,विजय सुरडकर, अनिल गायकवाड, भय्यासाहेब कसबे , प्रफुल्ल साळवे,गणेश शिंदे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वंचित बहुजन महिला आघाडी,युवक आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहॆत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web