मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री.उदय सामंत व विधान परिषद आमदार डॉ. मनिषा कायंदे यांच्या समवेत मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. मिलिंद तुळसकर यांच्या पूर्व परवानगीने शुक्रवार दिनांक ०५ मार्च,२०२१ रोजी मत्रांलयात मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेच्या सल्लागार डॉ. सुप्रिया करंडे मॅडम संघटनेचे सरचिटणीस श्री. संतोष नेपाळे, सचिव अक्षया डोंबे, कोअर कमिटी सदस्य विजय पगारे आणि प्रसाद तेली यांच्या उपस्थित महत्वपूर्ण बैठक पार पडली. 

मुंबई विद्यापीठातील सदर बैठकीत सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ, २००९ ते २०१६ चा भविष्य निर्वाह निधी, नैमित्तिक रजा, वैद्यकीय रजा आरोग्य विमा, कुलसचिव यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र, व अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिला कर्मचारी प्रसुती रजेवर गेल्या होत्या  व तदनंतर मुंबई विद्यापीठ प्रशासन त्या महिलांना कामावर रुजु करुन घेत नव्हते त्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना त्वरित कार्यालयात रूजु करून घेणे याबाबतचे आदेश मा. मंत्री सावंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले.

सदर चर्चा सकारात्मक झाली असुन उपरोक्त सर्व सुविधा सर्व कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील अस्थीयी कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत दरम्यान अशी माहिती संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे अन्यथा महिला दिनाच्याचे औचित्य साधून आंदोलन करण्यात येणार आहे तब्बल १२०० अस्थायी कामगार काम करतात .

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web