सापर्डे येथील महिलेच्या हत्या प्रकरणात पिस्तुल पुरवणारे दोन जण अटकेत

कल्याण प्रतिनिधी – खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापर्डे गावात २२ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झालेली हत्या हि अनैतिक संबध आणि लुटीच्या उद्देशाने झाल्याचे निष्पन्न झाल आहे. या आरोपीने सुरुवातीला तपासा दरम्यान  वारंवार पोलिसांची दिशाभूल केली मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत या हत्येचा गुंता सोडवला. याआरोपी पर्यंत पोचण्यासाठी साशा या पोलिसांच्या श्वानाने देखील मदत झाली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केलीय. मुख्य आरोपी पवन म्हात्रे याला गावठी पिस्तुल पुरवणाऱ्या जयेश जाधव आणि अजय पवार या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण जवळील सापर्डे गावात २२ फेब्रुवारी रोजी एका महिलेची हत्या करण्यात आली. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली होती. आरोपी पवन म्हात्रे याने सुवर्णा गोडे या महिलेचा खून केला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी आरोपीने संबंधित महिलेचे अनैतिक संबंध होते त्यातूनच हा प्रकार घडला. या झटापटीत त्याची आई जखमी झाली, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, आता खडकपाडा पोलिसांच्या तपासात या घटनेला वेगळं वळण मिळाले आहे आरोपी पवन याने लूटीच्या इराद्याने सुवर्णा गोडे हीला हळदी कार्यक्रमाच्या रात्री काही बहाण्याने घरात नेले. आरोपी पवन म्हात्रे याने त्याच्याकडील गावठी कट्ट्याच्या पिस्टलने सुवर्णा गोडे  महिलेच्या डोक्यात गोळ्या घातल्यानंतर तिच्या गळ्यातील ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेत ते स्वताच्या घरात लपवून ठेवले तसेच हा प्रकार पाहिल्यामुळे त्याने स्वताच्या आईवर देखील गोळी झाडून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याच उघड झालंय.

  पोलिसांनी पवन म्हात्रे याला अटक केली आहे. तर त्याने नेवाळी येथील मित्र जयेश जाधव याच्या ओळखीने मध्य प्रदेशातून अजय पवार याने आणलेले गावठी पिस्टल २५ हजार रुपयात खरेदी केल्याने या दोघानाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पवन याने हा गुन्हा अनैतिक संबध आणि सोन्याच्या ह्व्यासापोटी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, खडकपाडा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. अशोक पवार, सपोनि धर्मेंद्र आवारे, पो.उप.नि. योगेश गायकर, अनिल पंडित व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web