कल्याण मधील ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येचा उलगडा,घंटा गाडीवरील कर्मचाऱ्याने केली हत्या

कल्याण  प्रतिनिधी- घरात एकटी राहणाऱ्या ७० वर्षीय हंसाबेन ठक्कर या वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ फेब्रुवारी रोजी कल्याण पश्चिम दत्त आळी  परिसरात घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत घरात एकटी राहणाऱ्या या महिलेची का व कुणी केली याचा शोध पोलिस घेत होते. काहीच सुगावा लागत नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला होता आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले होते. अखेर तपासा दरम्यान वासू ठाकरे हा घंटागाडी चालक तिच्या घरी आल्याची माहिती त्यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी या घंटागाडी चालकाला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. वासू हा कर्जबाजारी झाल्याने त्याला पैशांची गरज होती लुटीच्या उद्देशाने त्याने तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वासू हा घंटा गाडी चालक असून तो सायंकाळच्या सुमारास पारनाका परिसरात पावभाजीची गाडी लावायचा. त्या निमित्ताने त्याची या महिलेसोबत ओळख झाली होती. वासू हा कर्जबाजारी झाला होता, त्याला पैशांची गरज होती.  सदर महिला हि घरात एकटी असून घरात पैसे असतील या लालसेपोटी त्याने या महिलेच्या घराची रेकी केली. हंसाबेन यांच्या घराच्या मागील वाजूस कचरा साचलेला होता. त्यांनी वासुला कचरा उचलण्यास सांगितले ही संधी साधत तो हंसाबेन यांच्या घरात घुसला व लुटीच्या उद्देशाने तिची हत्या केली मात्र घरात काहिच हाती न लागल्याने त्याने तेथून पळ काढला होता.

अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांप्रमाणे बाजारपेठ पोलीस ठाणे तपास पथकांनी गुन्हा दाखल झालेपासून टिळक चौक व कल्याण परिसरात सातत्याने शोध मोहिम राबविली व सपुर्ण परीसर पिंजून आरोपीचा शोध घेण्याकरिता कसोशिने प्रयत्न केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि यशवंत चव्हाण पोलीस निरिक्षक राजेंद्र अहिरे,  बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला असून पुढील तपास सपोनि विजय अहिरे हे करत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web