कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

कल्याण प्रतिनिधी – महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला काही देणेघेणे नाही. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित राहिले म्हणजे सर्व जनता सुरक्षित असल्याचे विद्यमान सरकारला वाटते हीच आजची परिस्थिती असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर घणाघाती आरोप केले. कल्याणच्या एनआरसी कंपनीच्या कामगाराकडून आपल्या हक्काच्या देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आंबेडकर यांनी भेट देत वंचित बहुजन आघाडीचा या लढ्याला पाठिंबा असल्याचे सांगितले .

एनआरसी कंपनीतील कामगाराकडून आपल्या हक्काच्या देण्यासाठी आणि राहत्या घरावर कारवाई होऊ नये यासाठी कल्याण मोहने येथे बेमुदत धरणे आंदोल सुरु केलंय .तब्बल 20 दिवसंपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली . यानंतर त्यांनी  कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी युनियन लढा देत असून त्यांनी न्यायालयातून कामगाराच्या घरावरील कारवाईला स्थगिती मिळविली आहे. त्यांचा लढा योग्य मार्गाने सुरु असून या लढ्याला आपला पाठिबा असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी बोलताना आंबेडकर यांनी सध्या राज्यात वाढलेल्या महागाईवर बोलताना त्यांनी कोरोना संकटात राज्य सरकारने आवश्यक अन्नधान्याचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे होते. म्हणजे आता हा साठा रिलीज करत महागाई आटोक्यात ठेवणे शक्य झाले असते मात्र सभागृहात एकमेकांचे उणे दुणे काढन्याचे गौडबंगाल असल्यामुळेच महागाई वाढत असल्याचा गंभीर आरोप केला .तर ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब योजनेची खिल्ली उडवताना महागाई झपाट्याने वाढत असताना सरकारला केवळ मी आणि माझे कुटुंब इतकीच चिंता आहे. जनता महागाईने होरपळली तरी मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित असल्याचा गोड गैरसमज करत सरकार राज्य करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.  तर विधानसभेत झालेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिवसेना कधीही हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नसल्याचे सांगताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांनी देखील भाजपा सरकारला बाबरी मशीद आपल्यामुळेच पाडल्याचा दावा केल्याची आठवण करून देत  बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर समाजवादी आणि सेना हे कायमच वेगवेगळे दिसतील असा दावा केलाय

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web