गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण मध्ये अटक, १०० किलो गांजा जप्त

कल्याण प्रतिनिधी- गांजा तस्करीसाठी कल्याणात आलेल्या गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. विजय पटेल असे या गांजा तस्कराचे नाव असून त्याच्याकडून १०० किलो गांजा हस्तगत करण्यात आलं आहे. 

गुजरात येथील गांजा तस्कर कल्याणात गांजा घेऊन येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत विजय पटेल याला ताब्यात घेतलं, त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे १०० किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे १४ लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने गांजा कुठुन व कुणाला विकण्यासाठी आणला याचा पोलीस शोध घेत आहेत. 

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, व.पो.नि. नारायण बानकर, पो.नि. संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, पो.हवा. विजय भालेराव, किरण शिर्के, पो.ना. सुनील भणगे, जे.जी.चौधरी, एस.एन.ठिकेकर, के.जी.जाधव, पो.शि. आर.एस. हासे, एस.आर.मधाळे, सोंगाळ यांनी केली आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web