अंबरनाथ मध्ये कुख्यात गुन्हेगाराकडून पिस्टल आणि चार जिवंत काडतुस जप्त

अंबरनाथ प्रतिनिधी -कुख्यात गुन्हेगाराला अटक करून पिस्टल आणि चार जिवंत काडतुस अंबरनाथ पोलिसांनी जप्त केली आहेत.संजय पाटील या गुन्हेगाराने ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात दहशत निर्माण केली होती. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ च्या शिवगंगानगर भागात नयन लोखंडे याने घराचे बांधकाम सुरू केले होते,त्याच वेळी संजय आणि त्याच्या तीन साथीदारांनी नयन याला तू कोणाला विचारून बांधकाम केले,आम्ही इथले भाई आहोत,आताच जेल मधून बाहेर आलोय अशी दमदाटी करून मारहाण केली.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस संजयचा शोध घेत होते,याच वेळी संजय हा सिद्धिविनायक नगर भागात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता एक पिस्टल आणि चार जिवंत काडतुस त्याच्या कडून जप्त करण्यात आली.या पूर्वी संजयवर ठाणे, पनवेल,मुरबाड,अंबरनाथ या शहरात खून,खुनाचे प्रयत्न, मारामारी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत,शिवाजी नगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्याच्याकडे पिस्टल आले कुठून आणि ती जवळ बाळगण्याचा त्याचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करीत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web