केडीएमसी जंबो कोविड सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार,उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉडबॉयने केला विनयभंग

कल्याण प्रतिनिधी – दोन दिवसा पूर्वी सुरु झालेल्या केडीएमसीच जंबो कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे. एका समाजसेवकाच्या पुढाकाराने हा प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या आधी कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. काही महिन्यापूर्वी कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरीत जंबो कोविड सेंटर तयार करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर तयार होऊन पडून होते.

आता कोरोना रुग्ण वाढत असल्याने हे सेंटर दोन दिवसापूर्वी सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी प्रसूती झालेली महिला ही कोविड पॉझीटीव्ह झाल्याने उपचारासाठी दाखल झाली. या महिलेचा सेंटरमधील एका कर्मचा:याने विनयभंग केला. महिलेने हा सगळा प्रकार महिला डॉक्टरसह तिच्या पतीला कळविला. समाजसेवक अजय सावंत यांच्या पुढाकाराने हे प्रकरण बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहचले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सदर घटनेसंदर्भात पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी श्रीकांत मोहिते याचा शोध सुरु आहे., हा प्रकार कोविड सेंटरमध्ये घडला आहे. हा दुदैवी प्रकार आहे. महिला वार्डात महिला कर्मचारी नियुक्त केले गेले पाहिजे .याचे गांभीर्य पालिका आरोग्य विभागाने ठेवले पाहिजे . श्रीकांत हा दोन दिवसापूर्वीच कामाला लागला होता. दरम्यान पालिका आरोग्य अधिकारी डॉ आश्विनी पाटील यांनी घटनेची चौकशी सुरू केली संबधित कोविड सेंटर कडे अहवाल मागविला आहे त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web