कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नको,केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचे आवाहन

कल्याण प्रतिनिधी-वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी व कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना घरी विलगीकरणाचा सल्ला देवू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे. 

महापालिका क्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांचे निदान लवकर होवून त्यांस त्वरीत उपचार होण्याच्या दृष्टीकोनातून खाजगी वैदयकीय व्यावसायिक यांच्याकडे येणा-या तापाच्या रुग्णांची तातडीने ॲन्टीजेन टेस्ट करुन घेणेबाबत सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना महापालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. तथापी महापालिका क्षेत्रातील काही वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी असलेल्या व वयस्कर पॉझिटिव्ह कोविड रुग्णांना होम आयसोलेशचा सल्ला देत असून, असे रुग्ण सहव्याधी असल्यामुळे होम आयसोलेशनमध्ये या रुग्णांची प्रकृती गंभीर होवून सदर रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 त्यामुळे महापालिका क्षेत्रातील खाजगी वैदयकीय व्यावसायिक यांनी सहव्याधी असलेल्या व वयस्कर रुग्णांस घरी विलगीकरणाचा सल्ला देवू नये, असा सल्ला दिलेल्या एका खाजगी वैदयकीय व्यावसायिकास महापालिकेमार्फत नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिक यांस शक्यतोवर घरी विलगीकरणाचा सल्ला देवू नये, असे आवाहन महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य विभागामार्फत सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांस करण्यात आले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web