डोंबिवलीत सनकी तरुणाचा प्रताप,कुत्रा चावल्याने बदला घेत कुत्र्याचा घेतला जीव

कल्याण प्रतिनिधी – कुत्रा चावल्याच्या रागातून एका सनकी तरुणाने त्या कुत्र्यालाच जीवे ठार मारल्याची घटना डोंबिवलीत घडली .याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अजय मगरे या सनकी तरुणाला अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड परिसरात राहणारा अजय मगरे हा तरुन मद्यधुंद अवस्थेत मीनाताई उद्यान बंद असताना त्याने  भिंतीवरुन उडी मारुन उद्यानात जाण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी उद्यानातील पाळीव कुत्र्याने त्याचा चावा घेतला होता. उद्यानाची देखभाल करणार्या अजय नायडू यांनी अजयला तत्काळ  शास्त्रीनगर रुग्णालयात नेले.याच वेळी त्याने कुत्र्याला मारून टाकण्याची धमकी दिली मात्र अजय मद्यधुंद अवस्थेत असल्याने नायडू यांनी दुर्लक्ष केलं . सोमवारी रात्री नायडू यांच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना अजयने कुत्र्याला मारुन गोणीत भरुन कचराकुंडीत टाकल्याची माहिती दिली. नायडू यांनी कचरा कुंडीतील गोणीत पाहिले असता त्यांना कुत्रा मयत अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी त्यांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत अजय मगरे याला अटक केलीय।

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web