प्रवाशांना कोल्ड्रींक्स मध्ये गुंगीचे औषध टाकून लूटणाऱ्या चोरास रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेडया

कल्याण प्रतिनिधी – कोल्ड्रिंक्स गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणा:या चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदराम चौधरी असे या भामटय़ाचे नाव असून आत्तार्पयत अनेक जणांना याने लूटले आहे.

बंगलोर येथे राहणारे दिलीप साकला नावाची व्यक्ती काही दिवसापूर्वी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी  बैंगलोरहून अजमेरला जाण्यासाठी एक्स्प्रेस पकडली. कल्याण स्टेशन गाठण्यापूर्वी त्यांची झोप उडाली. त्यांच्या हातातील महागडे ब्रेसलेट गायब होते. पोलिसांनी विचारपूस केली. तेव्हा त्याने सांगितले की, ट्रेनमध्ये एका युवकाने मैत्री केली. त्याने त्यांच्याकरीता कोल्ड्रिंक्स आणले. कोल्ड्रिंक्स घेतल्यावर त्यांना झोप आली. पोलिस समजून गेले की, त्यांना गंडा घालण्यात आला आहे. पोलिसानी तपास सुरु केला. 

वडदोरा रेल्वे पोलिसांकडून माहिती मिळाली की, गोविंद राम चौधरी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यांनी कल्याण जवळपास ट्रेनमध्ये एका व्यक्तीला लूटले होते. या प्रकरणी कल्याण जीआरपीचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांचे म्हणणे आहे की, गोविंद चौधरी हाच व्यक्ती होता. त्याने यांना लूटले होते. या प्रकरणात पूढील तपास करीत राजस्थानहून चोरी गेलेला महागडे ब्रेसलेट पोलिसांनी हस्तगत केले आहे. 

गोविंदराम चौधरी हा राजस्थानचा राहणारा आहे. चांगल्या घरातील आहे. त्याला आफीमचे व्यसन आहे. तो ट्रेनमध्ये तिकीट घेऊन प्रवास करतो आणि खाण्या पिण्याच्या पदार्थामध्ये गुंगीचे औषध देऊन लूटतो. वडदोरामध्ये अशा प्रकारचे त्याने दोन गु्न्हे केले आहे. या व्यतिरिक्त चौधरी याने अशा प्रकारे किती लोकांना गंडा घातला आहे. याचा तपास सुरु आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web