कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी

कल्याण प्रतिनिधी– कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका मुख्यालयातही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याच प्रमाणे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस व अर्ध पुतळ्यास देखील पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. डोंबिवलीतही महापालिकेच्या विभागीय उपायुक्त (फ व ग)पल्लवी भागवत यांनी मानपाडा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web