भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेप्रकरणी मनपाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांसह चौघांना अटक

भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथे जिलानी इमारत कोसळल्याची घटना २१ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत ३८ नागरिकांचा मृत्यू तर २३ रहिवासी जखमी झाले होते. या दुर्घटने बाबत देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री तसेच देशातील सर्वच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केले होते. बुधवारी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना ३ लाखांची नुकसान भरपाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निधी मंजुरीनंतर या दुर्घटनेस जाबाबदार असलेल्या इसमांवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होत असतांनाच नारपोली पोलिसांनी या प्रकरणी इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकासह मनपाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त तसेच बिट निरीक्षक व लिपिक या चौघांना अटक केली आहे. या अटक कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसह या अवैध बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या मनपाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.              

या दुर्घटने प्रकरणी जिलानी इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे अवैध बांधकाम केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक मोहमंद मुख्तार गुलाम रसूल फंडोले (वय ७६ वर्षे ) याच्यावर विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्या पासून फंडोले फरार झाला होता. तसेच त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते , अखेर त्याचा शोध घेऊन नारपोली पोलिसांनी त्यास बुधवारी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता या प्रकारणात भिवंडी निजामपूर शहर महानगरपलिकेच्या प्रभाग समिती ३ चे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुदाम नारायण जाधव यांच्यासह तत्कालीन बिट निरीक्षक सुनिल सिताराम वगळ, भूभाग लिपिक प्रफुल्ल प्रकाश तांबे यांचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने गुरुवारी मनपाच्या या तीनही कर्मचाऱ्यांना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. आज या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता या तिघांनाही ४ मार्च पर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली असााायाचीलल असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली असून सदर गुन्हयाचा तपास भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, नारपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मालोजी शिदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी हे करीत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web