नवी दिल्ली – नागपूर जवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालयासाठी केंद्र शासनाने 4.25 कोटी रूपयांचा निधी बुधवारी वितरीत केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त नागपूर जवळील शांतीवन, (चिंचोळी) येथील बाबासाहेबांच्या स्मृती संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्र शासनाने वर्ष 2016 मध्ये 17.3 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी पहिला हप्त्याचा 4.25 कोटी रूपयांचा निधी नोव्हेंबर 2016 मध्ये दिला. दुस-या हप्त्याचा 4.25 कोटी रूपयांचा निधी बुधवार 17 फेब्रुवारी 2021 ला वितरीतकरण्यात आला. शांतीवन मधील संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्ती जतन करून ठेवल्या आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी आयुष्याशी निगडीत जवळपास 400 पेक्षा अधिक वस्तु आहेत. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर वापरत असलेले कपडे यामध्ये सदरा, कोट, कुर्ते,टाय,मोजे आहेत.यासह वकीली करीत असतानाचा बॉरीस्टर गाऊन येथे आहे. त्यांचे हस्तलिखीत पत्रे, ग्रामोफोन, छड़ी, टेबल-खुर्ची, पेन, टाइपराइटर अशा अनेक वस्तु या संग्रहालयात आहेत. शांतीवन, चिंचोळीच्या संग्रहालयाचे लोकार्पणयेत्या 6 डिसेंबर 2021 रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच या महापरिनिर्वाणाच्या दिवशी होईल, अशी अपेक्षाडॉ. आंबेडकर फॉऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली आहे.
