एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार, नटबोल्ट विना धावत होती एसटी

कल्याण प्रतिनिधी– कल्याण शीळ रोडवरील मानपाडा रोड वर घडलेल्या एका घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हात्यावर आलाय .पनवेल डेपो मधून सुटलेली एसटी काल कल्याण डेपध्ये आली .आज सकाळी पुन्हा प्रवासी घेऊन पनवेलच्या दिशेने रवाना झाली .मात्र कल्याण शीळ रोड वर मानपाडा रोड वर पोचताच एसटीच्या मागील चाकात काही गडबड असल्याचं चालकाच्या लक्षात आलं .त्याने एसटी थांबवून बघितलं असता चाकाचे नट बोल्ट निखळल्याचे दिसून आले .वेळेवर प्रसंग माहिती पडल्याने एक मोठा अपघात टळला आहे. मात्र एसटी महामंडळाकडून एसटी ची किती देखरेखन,देखभाल दुरुस्ती केली जाते हे समोर आलंय .याबाबत कल्याण बसडेपोचे आगार प्रमुख विजय गायकवाड यांनीही बस पनवेल डेपोची होती. कल्याण मुरुड मार्गावर चालणारी आहे. पनवेल डेपो मध्ये देखभाल दुरुस्तीचे काम होत ,एसटीच्या चाकाच्या एक्सेलचे नटबोल्ट निखळले होते मात्र घटनेची माहिती मिळताच गाडीच्या दुरुस्तीचे काम कल्याण बस डेपोमध्ये सुरु असल्याचं सांगत कॅमेरा समोर बोलण्यान नकार दिलाय

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web