शिक्षक साहित्य संमेलनातर्फे मनिषा कडव यांना पुरस्कार प्रदान

मुंबई प्रतिनिधी– शिक्षक व शिक्षकेतरांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समूध्दीसाठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेले शिक्षक साहित्य संमेलन यंदाचे दहावे वर्ष . कोरोनाच्या पाश्वभूमीमुळे दहावे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन दिनांक ३० व ३१जानेवारी २०२१ रोजी आँनलाईन पध्दतीने पार पाडले . या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यात मुंबईतील डी.एस. हायस्कूलच्या ग्रंथपाल सौ.मनिषा राजन कडव यांच्या सचित्र कविता “‘हिमराणी'” ला उत्कृष्ट कवितेचा सन्मान मिळाला . नुकत्याच रविंद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या शिक्षक स्नेहसंमेलनात आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. जयवंत पाटील , शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे , कार्याध्यक्ष सुभाष मोरे व प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web