कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायती मध्ये गावदेवी पॅनलची बाजी

कल्याण प्रतिनिधी :- कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उप -संरपंच पदांच्या दुसऱ्या टप्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडला मात्र सर्वात तालुक्यात चर्चेची कांबा ग्रामपंचायत ठरली आहे,राजकीय पक्षांना छेद देत कांबा मध्ये गावदेवी पॅनल ची बाजी मारली. टी .ओ. के.टीम ने चांगल्या प्रकारे सहकार्य केले. तालुक्यात सर्वात कारखाने आणि उद्योग असणाऱ्या ग्रामपंचायतीवर ताबा मिळावा आहे.

राजकीय टंग्याची दादागिरीवर मात करीत ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखवले आहे .कल्याण तालुक्यात सर्वात चर्चेत राहिलेली ग्रामपंचायत म्हणजे कांबा ,स्थानिक पातळीवर एकमेकां विरोधात लढणारे उमेदवार निवडणून आल्यावर मी या पक्षाचं मी त्या पक्षाचा असा गोंधळ करीत राजकीय नेते आणि पदाधिकारी आगीत तेल टाकीत गावातील वातावरण खराब करतात. राजकीय पक्ष आणि टंग्याची  मुजोरी दूर करत कांबा ग्रामपंचायत मध्ये गावदेवी पॅनलने बाजी मारून सत्ता हस्तगत केली आहे . अध्यादेशी अधिकारी जे एन गाऱ्हाणे यांनी सरपंच पदी भारती महेंद्र भगत आणि उप संरपंच संदीप कुंडलिक पावशे १३ सदस्य पैकी ७ मते मिळवून विजय घोषित करण्यात आले.त्याच्या बाजूने सोनाली विजय उबाळे , छाया कुंडलिक बनकरी, इशा विजय भोईर, संतोष पावशे , हरेश सवार यांनी मते दिली. त्याच प्रमाणे ग्रामस्थ मदन उबाळे , छगन बनकरी,रविंद्र शांताराम शिरोसे, बाळाराम भोईर, अनंता ठाकरे, वाशीम खान, यांनी मोठ्या प्रमाणात गावातील एकता आणि राजकीय टंग्याच्या दादागिरी दाद न देता गावदेवी पॅनल विजयी होण्यासाठी मोलाचे काम केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web