बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,माता रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि) कल्याण आयोजित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आणि संस्थेचा वर्धापनदिन सोहळ्या निमित्ताने भव्य वक्तृत्व स्पर्धा अत्रे रंग मंदिर मधील कॉन्फरन्स हॉल रविवारी ता.०७  सांयकाळी  आयोजित करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि) कल्याण  यांच्याव्दारे संयुक्त जयंती आणि ववतृत्व स्पर्धा  रविवारी सांयकाळी अत्रे रंगमंदिर मधील कॉन्फरन्स हॉल मध्ये संपन्न झाला .                       

राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या कडून त्याग आणि विचार आजच्या महिलांनी , तरुणांनी अंगीकृत करून यांच्यापासून नवीन पिढीला घडवण्याचे काम केले पाहिजे.असे प्रतिपादन साहित्यिक प्राध्यापक गाथा सोनवणे  यांनी कार्यक्रमा प्रसंगी काढले . 

 यावेळी ववक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आली होती त्यात विषय माझ्या अनुभवातील कोरोना आणि परीक्षक म्हणून प्रा.साहित्यिक कवि मा.श्री.शुक्राचार्य गायकवाड सर डॉ . प्रतिभा पाटील , आणि आंबेडकर चळवळीतील गाडे अभ्यासक मा.श्री जयवंतजी सोनवणे सर हे होते.! वक्तृत्व स्पर्धेत दहा ते पंधरा स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्याचे स्वरूप एक हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात प्रथम क्रमांक राजू काऊतकर, दृतिय- विजय सरकटे, तिसरा- अनघा पवार, यांनी पटकावला . संयोजक,आयोजक आणि परिक्षकांचे व उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले या वेळी व्यासपीठावर आंबेडकर चळवळीचे साहित्यिक जयवंत सोनवणे , माजी महापौर रमेश जाधव , अध्यक्ष चंद्रकांत पोळ , पौर्णिमा कांबळे , सूत्रसंचालन समाधान मोरे, यावेळी संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब काकडे, सुनिल आबाडे, भूषण कोकणे , संतोष हेगेंडे नागेश टोळ दामोदर साळवे, विलास कांबळे आणि मोठ्या संख्येने कार्यकते आणि महिला वर्ग उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web