सोलापूर महानगरपालिका व संभव फाऊंडेशनच्या वतीने खिळेमुक्त झाड अभियान

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर महानगर पालिका व संभव फाउंडेशन च्या वतीने सोलापूर शहरात खिळेमुक्त झाड अभियान संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिष कविता लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. या अभियानाची सुरुवात शहरातील जुना एम्प्लॉयमेंट चौक येथून करण्यात आली.यावेळी येथील झाडावर लावलेल्या जाहिरातीचे फलक काढून टाकण्यात आले.
यावेळी जुना एम्प्लॉयमेंट चौक ते सात रस्ता परिसरात असणाऱ्या सर्व झाडांवरील खिळे, पोस्टर्स काढून झाडांना खिळे मुक्त आणि पोस्टर मुक्त करण्यात आले.खिळेमुक्त झाड अभियानाची मोहीम सुरू असताना संबंधित व्यापारी वर्गाने या मोहिमे स्वागत केले.अनेक दुकानदारांनी फलक त्यांनी स्वतः काढून खिळे मुक्त झाड अभियानाला पाठिंबा दर्शवीला.
खिळेमुक्त झाडे हे अभियान निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सोलापूर महानगर पालिका आणि संभव फाऊंडेशनच्या पुढाकाराने घेतलेली छोटीशी चळवळ आहे.
झाडांद्वारे नैसर्गिक आँक्सिजन मिळत असतो व याच झाडांना जपण्यासाठी आपण कमी पडत आहोत.
पुढील पिढीसाठी आपण ही नैसर्गिक संपत्ती जपली पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे हा एकच उद्देश आहे.
अशा तऱ्हेने आज खिळेमुक्त झाड अभियान सोलापूर शहरात राबवले गेला.सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेत संभव फाऊंडेशनचे आरती लांडे,प्रा.पवन व्हनकवडे, प्रा.गणेश पवार, स्नेहल माने,शोभा शेंडगे,संतोष धावणे,आतिश कविता लक्ष्मण,राणी राजगुरु आदींनी मोहीमेत सहभाग नोंदवत खिळेमुक्त झाड,ग्रीन सोलापूर स्मार्ट सोलापूर साठी पुढाकार घेतला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web