मुंबई प्रतिनिधी – कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.या संदर्भात घोषणा करताना कामगार नेत्यांनी म्हटले आहे,राज्यातील साहित्य, सामाजिक, कला,क्रीडा व कामगार चळवळीत विशेष दैदिप्यमान काम करणाऱ्या ओद्योगिक कामगारा़नी आपल्या कार्याच्या संग्रहित माहितीसह अर्ज संघाच्या कार्यालयात पाठवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.पुरस्काराचे यंदाचे नववे वर्ष आहे.त्या साठी तज्ज्ञांची निवड समिती गठीत करण्यात आली आहे.सोबत कामगार चळवळीत आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महनीय कामगार नेत्याला प्रतिष्ठेच्या आंबेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, मात्र त्या साठी नामांकने मागविण्यात आलेली नाहीत.त्यांची नामांकने निवड समितीच्या चर्चेतून निश्चित होतील.पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ आणि धनादेश असा आहे.आंबेकर जीवन व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा नंतर जाहीर करण्यात येईल.
प्रस्ताव दि.१० मार्च २०२१ पर्यंत दाखल करावयाचे आहेत.संपर्क कथालेखक काशिनाथ माटल, समन्वयक,रा.मि.म.संघ,गं.द.आंबेकर मार्ग परेल मुंबई ४०००१२.मोबाईल क्र.९८९२४८७७९३