सोलापूर-पुणे हायवेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी

सोलापूर – केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत.यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर-पुणे हायवेवर सावळेश्वर टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सरकारने आंदोलनाची दखल नाही घेतल्यास तीव्र आंदोलने करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे .
यावेळी सोलापूर-पुणे हायवे रोड काही काळासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यानी रोकून धरला होता.या आंदोलनात लांबोटी येथील ब्रम्हा चिट्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहभागी झाले होते.यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने लोकसभेत व राज्यसभेत शेतकरी विरोधातील कायदे केले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना काही कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनून राहावे लागेल.सर्व सामान्य शेतकरी उध्वस्त होतील.हा कायदा करून सरकार शेतकऱ्यांच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे.परंतु शेतकरी हितासाठी हे कायदे रद्द करावे.दिल्लीत या 3 काळ्या कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांच्या संनदशील अहिंसेच्या मार्गाने मागील 70 दिवसापासून आंदोलन सुरू असून केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लाठीचार्ज,पाण्याचे फवारे,अश्रूधुर तसेच शेतकऱ्यांवर खलिस्तानी,नकक्षलवादी,देशद्रोही असे आरोप लावून आंदोलन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.परंतु शेतकरी विरोधातील कायदे रद्द करून सर्व पिकांना कायदेशीर हमीभाव जाहीर करेपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही.केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने यापेक्षा ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे,जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील,ब्रम्हा चिट्टे,श्रीपती धुणे,पिलांनी शेख,सनी पाटील,बापू वाघमोडे,प्रकाश तांबे,बाळू गोवर्धन,प्रकाश पाटील,नानासाहेब सावंत,शत्रूघन धोत्रे,सागर काळे,पप्पू कदम,नवनाथ मसलकर,अमोल पाटील,अमोल अदमाने,पप्पू सावंत,लक्ष्मण पाटील आदीसह मोहोळ तालुक्यातील विविध गावचे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web