ठाणे वाहतूक पोलिसांच्या सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा अभियाना अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन

प्रतिनिधी

ठाणे – रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणा-या ठाणेकरांना ७ फेब्रुवारी रोजी जवळपास ३०० सुपर बाईक्सचा अनोखा नजराणा अनुभवता आला. हार्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल एन्फिल्ड, निंजा, कावासाकी, अप्रिलिया अशा अनेक आकर्षक बाईक्स त्यात सहभागी होतील. ठाणे वाहतूक पोलिसांच्या ‘सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा’ अभियाना अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीसाठी वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह मराठी सिनेक्षेत्रातील प्रतिथयश कलाकार हजेरी लावली. रविवारी सकाळी ८ वाजता ठाणे शहरातील कोर्ट नाका परिसरातून सुपर बाईक्सच्या संचलनाला सुरूवात झाली. ठाणे पोलीस आयुक्त मा. श्री. विवेक फणसळकर यांच्या हस्ते या संचलनासाठी हिरवा झेंडा दाखविला.सह पोलिस आयुक्त श्री सुरेश मेखला, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेते मकरंद अनासपूरे, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते हे कलाकार बाईकर्सच्या उत्साह वाढविण्यासाठी या सोहळ्याला हजेरी लावली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. ठाणे शहरांत जवळपास २० किमीचे संचलन करून या बाईक्स पुन्हा कोर्ट नाका येथे दाखल होतील. ठाणेकरांनी संचलन मार्गावरील रस्त्यांच्या कडेला उभे राहून या सोहळ्याचा आनंद घेतला आणि बाईकर्सना प्रोत्साहन घेतला.रूट:कोर्ट नाका येथून सुरू होणारी रॅली टॉवर नाका, गडकरी रंगायतन, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरि निवास, तीन हात नाका,कॅडबरी जंक्शन, शास्त्री नगर, उपवन, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, खेवरा सर्कल, टिकुजिनी वाडी :मानपाडा, ब्रम्हांड , पाटलीपाडा,हिरानंदानी इस्टेट पर्यंत ही रॅली जाईल. त्यानंतर युटर्न घेत घोडबंदर रोड मार्गे कापुरबावडी,माजिवडा,मिनाताई ठाकरे चौक, पोस्ट आँफिस मार्गे मार्ग क्रमण केले. त्यानंतर कोर्ट नाका येथे रॅलीची सांगता झाली

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web