दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक

प्रतिनिधी.

डोंबिवली – वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या. योगेश महेश भानुषाली मुकेश महेश भानुषाली अशी आरोपींची नावे आहेत तर समीर अक्रम सय्यद या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.जिम ट्रेनर असलेल्या योगेश भानुशाली याने लवकर श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहात चोरीचा मार्ग पतकरला भावाच्या आणि मित्राच्या मदतीने त्याने मागील वर्षात मानपाडा कोळसेवाडी विष्णुनगर मुंब्रा ही लाइन आणि नाशिक परिसरातून तब्बल अकरा दुचाकी ची चोरी केली चोरी केलेल्या सर्व मोटर सायकल त्यांना एका मैदानात जमा करून ठेवल्या होत्या या मोटरसायकल विक्रीला काढत असताना पोलिसांनी २७ जानेवारी रोजी डोंबिवली एमआयडीसी परिसरातुन त्याने चोरलेल्या रॉयल ऐंफिल्ड या चोरीच्या गुन्हयातील सीसीटीव्हीच्या आधारे योगेशला अटक केली त्याने दिलेलेल्या माहितीच्या आधारे त्याचा भाऊ मुकेश याला अटक केली तर त्यांना चोरीच्या गुन्हत्यात साथ देणाऱ्या फरार अक्रमचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web