डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१९ करिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी.

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकारिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१९ (BANRF-२०१९) साठी १०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी बार्टी, पुणेच्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.in  ला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. १५ फेब्रुवारी २०२१  ते दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेचे महासंचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web