जोशाबा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कारंडे यांची निवड

प्रतिनिधी.

सोलापूर – जो.शा.बा.पतसंस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची बैठक नुकतीच पार पडली.ही बैठक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष व जो.शा.बा. पतसंस्थेचे संस्थापक शामराव जवजाळ यांच्या अध्यक्षतेखाली पडली.या बैठकीमध्ये मोहोळ येथील शिक्षक बाळासाहेब कारंडे यांची जोशाबा पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र शामराव जवंजाळ यांनी दिले आहे.

पतसंस्थेला पुढे नेण्याचे काम पुणे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कारंडे यांनी केल्याने त्यांच्या कामाची दखल घेत पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती बाळासाहेब कारंडे यांनी दिली.

पतसंस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल कोटीच्या पुढे आहे.या पतसंस्थेमार्फत मागासवर्गीय शिक्षकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्याचे पतसंस्थेचे उद्धिष्ट आहे.

यावेळी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर बनसोडे,जिल्हा सरचिटणीस रहीम शेख,राज्य सहसचिव शशिकांत खुडे, राज्य उपाध्यक्ष राम निकंबे,पतसंस्थेचे संचालक मंडळ डी. पी लांबतुरे,पा.वा जाधव,उमाजी कांबळे,दीपक गायकवाड,राऊत,भिसे,तुकाराम जावीर,महेश्वर कांबळे,शाम शिंगे, तज्ज्ञ संचालक विद्याधर भालशंकर,नामदेव सरवदे, अध्यक्ष विजयकुमार काळे,परमेश्वर किनगी,जिल्हा संघटक किरण सगेलं,कोर कमिटी सिकंदर शेख, माध्यमिक सचिव जयकर ठोंबरे,आर.पी कांबळे, महादेव गवळी,भाग्यवंत आदी कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web