औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम, महिला पोलीसांवर बीट अंमलदाराची जबाबदारी

प्रतिनिधी.

औरंगाबाद – राज्यात औरंगाबाद पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयाने नवीन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. यात महिला पोलीसांवर बीट अंमलदाराची जबाबदारी देऊन महिलांना पोलीस दलात समान संधी उपलब्ध करून दिल्याने बीट अंमलदार हे कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडतील, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिला बीट अंमलदार परिसंवाद व आढावा बैठकीत बोलतांना व्यक्त केला.

यावेळी आ. कल्याण काळे, आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, याबरोबरच पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी आणि चाळीस महिला बीट अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाने कोविड कालावधीत तत्पर राहुन काम केले आहे. त्याच प्रमाणे गुन्हे तपासणीचे प्रमाण वाढवले असून ‘तुरंत 24’ या विशेष प्रतिसादात्म्क कार्यक्रमास नागरिकांच्या तक्रारींचे 99 टक्के पर्यंत निपटारा केला आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल लोकाभिमुख काम करीत आहे. याचबरोबर ‘अभिन्न’ या कार्यक्रमांतर्गत शाळा महाविद्यालयामध्ये लिंगभेद होऊ नये यासाठी विविध उपक्रमातून जाणीव जागृती व माहिती दिली जात आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतीमा सुधारण्याबरोबरच सुरक्षा, सन्मान आणि स्वावलंबन यासाठी महिला बीट अंमलदारांचे सहकार्य होईल असे प्रास्ताविकात श्रीमती पाटील म्हणाल्या. यानंतर कार्यक्रमात ‘कोविड वुमन वॉरीअर’ या राष्ट्रीय महिला आयोगामार्फत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री यांनी  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते महिला बीट अंमलदारांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. जकीया अजिज शेख-देवगाव रं, सी.यु.नगराळे-चिकलठाणा, एस.व्ही.कुंदे-बिडकीन, एस.एस. जाधव-चिकलठाणा, एस.यु. गायकवाड-फुलंब्री, एस.जी. भुरे-शिवुर, व्ही.एन.सोनवणे-सिल्लोड शहर, एस.ए. कांबळे-पिशोर, जे.एम. परळे-फर्दापूर, एस.टी.वर्पे-शिल्लेगाव, जे.एन.काळे-सिल्लोड शहर, के.एस. शिंदे-पैठण, आर.बी. पवार-पैठण, एल.एम.ढोले-सिल्लोड ग्रामीण, एस. आर. सौंदरमल-चिकलठाणा, व्हि.जी. कबाडे-पाचोड, आर.बी. कांबळे-वडोदबाजार, पी.आर. गायकवाड-खुलताबाद, ए.एम. नायमणे-शिवुर, आर.पी.काहीटे-शिवुर, जे.डी. जैस्वाल-चिकलठाणा, डि.डी.चिकटे-अजिंठा, डी.एस.चेके-अजिंठा, एस.एल.गोरे-कन्नड ग्रामीण, एस.एन.दांडगे-कन्नड ग्रामीण, एस.एम.गिरी–कन्नड शहर, के.आर. मिस्तरी-सोयगाव, बी.आर.जाधव-वडोदबाजार, कविता सांडू रगडे-शिल्लेगाव, मोनिका प्रकाश सिरसाट-शिल्लेगाव, आर.एस. माने-वैजापुर, एस.डी. मोटे-विरगाव, जे.एस.गावीत-वैजापूर, ए.एल.भोये-विरगाव, के.एस. जाधव-गंगापूर, आर.एस.गायकवाड-गंगापूर, ए.व्ही.मुळे-करमाड, एस.ए.बारगळ-कन्नड शहर, ए.के. गांगुर्डे-शिल्लेगाव, पद्मा देवरे-स्थानिक गुन्हे शाखा.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web