राष्ट्रीय मिल संघ वाचनालयाचा मराठी भाषा संवर्धन दिन सपन्न

प्रतिनिधी.

मुंबई – राष्ट्रीय मिल मजदूर संघ,ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने दि.१४ ते २८ जानेवारी पर्यंत मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा सजरा करण्यात आला. समारोप दिनी उपस्थित सर्व वक्त्यांनी मराठी भाषेचे सवर्धन होणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी खजिनदार निवृत्ती दसाई होते.कार्यक्रमात वाचकही सहभागी झाले होते.
राष्टीय मिल मजदूर संघचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या पंचवीस वर्षांत ग्रथालय आणि वाचनालयाचे अत्याधुनिकरण केले.इ-लायब्ररीकरण करण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न चालू आहेत,असे सांगून खजिनदार निवृत्ती देसाई म्हणाले,मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे गेली आहे.संत काळापासून मराठी भाषा प्रगती पथावर असून तिचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.
उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सांगितले, ब्रिटिशांचा अंमल असल्या पासून मराठी भाषेची वाटचाल सुरू असून मराठी बोली भाषा मैलागणिक बदलत गेली असली तरी मराठी साहित्यात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कथा लेखक काशिनाथ माटल म्हणाले, मराठी भाषेने मराठी माणसाला घडविला.मराठी लेखकांनी ही भाषा समृध्द केली आणि अटकेपार नेली.परंतु आता तिला नव्यापिढीमध्ये तिच्या विषयी आवड निर्माण करावयास हवी !सहाय्यक सचिव मोहन पोळ, वाचनालयाच्या प्रभारी ममता घाडी,प्रियंका परब,आशा आसबे श्रावणी पवार यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.मधू घाडी,दीपक वाळवे, सुहास हरमळकर यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web