वृद्धाला फेकले शंभर फूट खोल दरीत लुटीसाठी मित्राच्या मुलानेच दिला दगा 

प्रतिनिधी.

कल्याण– घरातील दागिने व रोख रक्कम लुटण्याच्या उद्देशाने रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्याच्याच मित्राच्या मुलाने साथीदारासह बहाण्याने अपहरण करून माळशेज घाटाच्या शंभर फूट खोल दरीत दगडाने ठेवून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र वयोवृद्धाचे नशीब बलवत्तर म्हणून शंभर फूट खोल दरीत ढकलुनही जीव बचावला त्यामुळे हा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या २४ तासातच आवळल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

शैलेश दत्तात्रय गायकवाड,वय ३५ भरत मच्छिंद्र गायकवाड वय ३४अशी गजाआड केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार प्रदिप वसंत जाधव, वय ३४  हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर प्रकाशलक्ष्मण भोईर, वय ६१  रा. राधानगर खकडपाडा असे खोल दरीतुन बचावलेल्या सेवा निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर सध्या कल्याणच्या  रेल्वे हॉस्पीटल मध्ये उपचार  सुरु आहेत.

घराच्या दुरूस्तीचे काम दिले नाही म्हणून केला गुन्हा.मुख्य आरोपीचे वडील व सेवानिवृत्त कर्मचारी भोईर यांचे मैत्रीचे संबध आहेत. त्यातच आरोपी शैलेश याला भोईर यांनी त्यांच्या घराचे दुरूस्तीचे काम दिले नाही याचा राग मनात धरून मुख्य आरोपी शैलेशने दोन साथीदाराच्या मदतीने २५ जानेवारी रोजी बहाण्याने बाहेर बोलून भाईर यांचे रिक्षातून अपहरण करून माळशेज घाटात नेवून त्यांच्या डोक्यात दगड घालून मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने शंभर फूट खोल दरीत फेकून देवून भोईर यांच्या घरातील सोने, रोख रक्कम, एटीएम कार्ड घरफोडी करून एकूण १४ लाख ५५ हजारऐवज लंपास केला होता.

भोईर यांना रात्रीच्या सुमारास माळशेज घाटातील दरीत फेकल्यानंतरआरोपीने त्यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम लंपास केली.मात्र भोईर गंभीर जखमी अवस्थेत त्यातच रात्री कसेबसे दरीतुन भोईर वर आले व त्यांनी घाटातील रस्त्याने जाणाऱ्या  ट्रॅक्टरला हात दाखवुन ट्रॅक्टर बसुन टोकावडे पोलीस स्टेशन येथे जावून घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर टोकावडे पोलीसांनी त्यांना तात्काळ प्राथमिकआरोग्यकेंद्रटोकावडे येथे उपचारासाठी नेले. त्यानंतर टोकावडे पोलीसांनी भोईर यांना कल्याणाच्या रेल्वे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते भोईर यांच्यावर उपचार सुरु असताना  महात्मा फुले चौक पोलीसांनी त्यांचा जबाब नोदंवून  तिन्ही आरोपीवर भादवि कलम ३६३,३६४,३९७,४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे २६ जानेवारी रोजी  गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सपोनि. सरोदे व त्यांचे डी. बी. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केला असता मुख्य  आरोपी शैलेंद्र उर्फ शैलेश दत्तात्रय गायकवाड, भरत मच्छिंद्र गायकवाड यांना २४ तासातच शिताफीने ताब्यात घेवून अटक केलेली असून त्यांनीगुन्ह्याची कुबली दिली आहे.  तसेच आरोपीने लंपास केलेला  मुद्देमाल  हस्तगत करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

 
 


 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web