भिवंडीत दाभाड केद्रातील विद्यार्थ्यांची रंगली ऑनलाइन संविधान कलम पांठातर स्पर्धा 

प्रतिनिधी

भिवंडी – भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी, त्या विषयी विद्यार्थ्यांना महत्व कळावे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावी तसेच विद्यार्थ्यांना संविधानाचे कलम माहीती व्हावे. प्रबोधन व्हावे, व शालेय जीवनापासूनच  विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाची मूल्ये रुजावी म्हणून भिवंडी तालुक्यातील दाभाड केंद्राने ऑनलाइन भारतीय संविधान कलम पाठांतर स्पर्धा आयोजित करून एक अनोखा स्तुत्य उपक्रम राबिवला आहे. दाभाड केंद्र स्तरावर मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो. यंदाचे तिसरे वर्षे असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी निलम पाटील यांच्या अध्यक्षते खाली दाभाड केद्रातील २५४  विद्यार्थी ऑनलाइन भारतीय संविधान कलम पाठांतर स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत  जि.प.शाळा दाभाड शाळेतील विद्यार्थी अनुष्का संभाजी खराडे या विद्यार्थिनीने ३४१ कलम पाठ करून सुवर्ण  पदक मिळविला आहे. तसेच गट क्रमांक एक मधून प्रथम क्रमांक  तनया रविद्र पडवळ(१२३ कलम पाठ)इयत्ता दुसरी मधील शाळा अस्नोली दाभाड,द्वितीय क्रमांक कुलदिप साईनाथ शेळके शाळा खंबाळा, तृतीय क्रमांक ध्रृव बापू पाटील शाळा खंबाळा यांनी पटकावला.गट क्रमांक  २ मध्ये प्रथम क्रमांक दक्ष संजय भोईर .जि.प.शाळा.शेडगाव (१९५ कलम पाठ), द्वितिय क्रमांक यज्ञिका साईनाथ शेळके शाळा खंबाळा.,तृतिय क्रमांक हिंदवी संदीप पाटील शाळा बासे यांनी पटकावला. गट क्रमांक ३ मधुन  दिक्षा मोहन ठाकरे. जि.प.शाळा.दाभाड (३१९ कलम पाठ),द्वितीय क्रमांक जिया प्रकाश ठाकरे .शाळा दाभाड., तृतिय क्रमांक तन्मय रमेश राऊत. शाळा पाली किरवली यांनी पटकावला.

 या कार्यक्रमास प्रमुख अतिथी उपसभापती सबिया भुरे,  प्राचार्य डाॅ.भरत पवार,शिक्षणाधिकारी ठाणे ललिता दहितुले, बीट विस्तार अधिकारी संजय थोरात, संजय असवले, सुरेखा भोई, वॆशाली डोंगरे ,केंद्र प्रमुख नरेश भोईर,रमेश शेरे,प्रबुध्द गायकवाड.,धनराज चव्हाण व पत्रकार मोनिश गायकवाड ,युवा कवी ,पत्रकार मिलिंद जाधव ठाणे व जिल्ह्यातील केद्रप्रमुख, तसेच विविध संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

भारतीय कलम पाठांतर स्पर्धा  हा उपक्रम सर्वच ठिकाणी राबविला पाहिजे.याचा विद्यार्थ्यांना पुढील जीवनात  अतिशय फायदा होणार आहे. असे गट शिक्षणाधिकारी निलम पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी युवा कवी मिलिंद जाधव यांनी ”भारतीय संविधान” कविता सादर केली. सदर स्पर्धेचे परिक्षण सुशांत ठाकरे,पुंडलिक पाटील,सुनिता चव्हाण यांनी केले. तर सुत्रसंचालन निशा पडवळ यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाभाड केद्रातील  संजय गोसावी, रविंद्र पडवळ,मंदार गोसावी,अशोक ठाणगे ,मनीषा धनगर,आश्विनी गावित,उदय पाटील,अमिता रिकामे,वर्षा पडवळ,ज्योती बिराजदार,प्रज्ञा भारती,गंगाराम पाटील,भालचंद्र पाटील, कविता घावट,कविता भोये,राजश्री भोईर,अरूणा बुचके,रविद्र जाधव,शीतल  धोदडे,शबाना काबाडी,बाळाराम पाटील,मंगेश निल्लेवार,स्नेहा प्रभु ,तसेच केद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मेहनत घेतली. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन  दाभाड केद्रातील केंद्रप्रमुख शामसुंदर दोंदे यांनी केले होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web