तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर

प्रतिनिधी.

नवी दिल्ली – देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल  सुधारात्मक सेवा पदक प्रदान करण्यात येतात.

देशातील 12 तुरुंग अधिकाऱ्यांची ‘राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदका’साठी निवड करण्यात आली तसेच 39 तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहेत, यात महाराष्ट्रातील तिघांचा  समावेश आहे. हवालदार सर्वश्री उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर झाले.

एका कर्मचाऱ्याला मरणोत्तर सुधारात्मक शौर्य सेवा पदक जाहीर झाले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web