२७ जानेवारी पासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु

प्रतिनिधी.

ठाणे – ठाणे  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा  5 वी ते 12 वी पर्यंतच्या  शाळा दि.27  जानेवारी पासून सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यातील  सर्व माध्यमांच्या व सर्व व्य वस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी दि. 16 जानेवारी  पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू आता  ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येतील. तसेच अंबरनाथ व कुळगाव बदलापुर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येतील.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web