राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आंदोलन यशस्वी

प्रतिनिधी.

मुंबई – आधी गिरण्या चालू करा,मगच आतील माल बाहेर काढू देऊ,या मागणीसाठी काल काळाचौकी येथील एन.टी.सी.इंडिया युनायटेड मिल न.५ वर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या झेंड्यखाली गिरणी कामगारांनी तिव्र आंदोलन छेडून चांगलाच हिसका दाखवला.त्या मुळे व्यवस्थापनाने येत्या पंधरा दिवसांत एनटीसीच्या तीनही गिरण्या क्रमा-क्रमाक्रमाने चालू करण्याचे लेखी आश्वासन संघटनेला दिले असून,पहिली टाटा मिल सुरू करण्यात येणार आहे. या घटनेचे गिरणी कामगार वर्गाकडून जोरदार स्वागत होत आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी नुकतेच सर्व पक्षाच्या खासदारांना निवेदन दिले आहे.गेल्या ११ महिन्या पासून बंद असलेल्या राज्यातील एनटीसी गिरण्या पूर्ववत चालविण्यास केंद्र सरकारला भाग पाडा! त्यातील सुमारे १० हजार कामगार आणि त्यांच्या कुंटुंबियांची त्वरित उपासमार संपुष्टात आणा! अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती.या प्रश्नावर संघटनेने न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत.त्याच प्रमाणे विविध मार्गाने या प्रश्नाचा निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर आदीं पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता.
आधी गिरणीतील तयार माल बाहेर काढण्यास संमत्ती द्या,त्यानंतर गिरण्या चालू केल्या जातील,अशी ताठर भूमिका अलिकडे एनटीसी व्यवस्थापनाने घेतली होती.परंतु अध्यक्ष सचिनभाऊ अहिर,यांनी आधी गिरण्या चालू करण्याचे लेखी आश्वासन द्या, त्यानंतरच आतील कच्चा माल बाहेर काढण्यास संघटना संमत्ती देईल,अशी रोखठोक भूमिका दि.१९ रोजी एन.टी.सी.ला पाठविलेल्या पत्राद्वारे केली होती.याच भूमिके आधारे खजिनदार निवृत्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी ३ वाजता जवळपास तासभर गिरणी कामगारांनी मिलच्या आवारात आंदोलन छेडले, त्याला अखेर वरील प्रमाणे यश आले आहे.उपाध्यक्ष अण्णा शिरर्सेकर,बजरंग चव्हाण, आदींची त्या वेळी भाषणे झाली.
उपाध्यक्ष सुनिल बोरकर, सेक्रेटरी लक्ष्मण तुपे,शिवाजी काळे आदींनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
केंद्र सरकारने पहिल्या सत्रात देशातील ५ गिरण्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात राज्यातील अचलपूरच्या फिन्ले गिरणीचा समावेश आहे.पण मुंबईतील तीन गिरण्यांचा प्रश्न अनुत्तरित होता.अनलॉकमध्ये आज अनेक उद्योगधंदे सुरू झाले, पण मुंबईतील गिरण्या २२ मार्च पासून बंद आहेत.त्यामुळे कामगार वर्गात असंतोष पसरला होता.संघटनेने कामगारांना पन्नास टक्के पगार मिळवून दिला, बोनसही मिळवून दिला.परंतु गिरण्या जोपर्यंत पूर्ण क्षमतेने चालत नाहीत तो पर्यंत ख ऱ्या अर्थाने कामगारांची उपासमार संपुष्टात येणार नाही,या व्यथेकडे कालच्या आंदोलनाद्वार एन.टी.सी.चे लक्ष वेधण्यात आले.
एनटीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक के.सी.पवार यांनी कालच मुंबईतील टाटा मिल पुर्ववत चालविण्याच्या प्रस्तावाला परवानगी मिळावी,असा मेल तांतडीने दिल्ली एन.टी.सी. प्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. काळाचौकी येथील इ़ंदू नं.५ आणि ना.म.जोशी मार्गावरील पोदार या दोन गिरण्या पूर्ववत चालविण्या बाबतचा प्रस्ताव या पूर्वीच दिल्ली एन.टी.सी.प्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ व्यवस्थापक के.सी.पवार यांनी आंदोलना दरम्यान राष्ट्रीय मिल मजदूर संघाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्या मुळे मुंबईतील प्रथम टाटा तर पाठोपाठ इंदू मि.क्र.५ आणि पोद्दार मिल पूर्ववत चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तब्बल ११ महिन्या नंतर रिकाम्या हाताला काम मिळून,उपासमार संपुष्टात येत आहे, त्या मुळे गिरणगावात कामगारांकडून समाधान व्यक्त होताना दिसतो आहे.
कालच्या आदोनात संघाचे मोहन पोळ,एम.पी.पाटील,संघटन सचिव मनोहर देसाई आदीं पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.टाटा,पोद्दार मिलचे संघटन सेक्रेटरी आणि प्रतिनिधीनी आंदोलनात सहभागी झाले होते.
एन.टी सी.व्यवस्थापनाने दिलेले आश्वासन नाही पाळले तर कामगार रस्त्यावर उतरतील,असा इशारा सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिला आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web