वंचितचा हिंगोली पॅटर्न यशस्वी आदिवासी समूहाच्या फॉरेन रिटर्न, डॉक्टरेट, महिला उमेदवारांच्या पॅनलचा दणदणीत विजय

प्रतिनिधी.

हिंगोली – महाराष्ट्रात राजकीय चमत्कार आणि वंचित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडीने हिंगोली जिल्ह्यात दिग्रसवाणी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये नऊ पैकी आठ ठिकाणी विजय प्राप्त करीत चमत्कार घडवून आणला.किमान सातवी पास अशी सदस्य सरपंच पदासाठी शासकीय अट असताना वंचित बहूजन आघाडीच्या आदिवासीसमूहाच्याफॉरेन रिटर्न, डॉक्टरेट, महिला उमेदवार व त्यांचे पॅनल विजयी झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे नऊ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते.त्यामध्ये डॉ चित्रा अनिल कुऱ्हे पॉलिटिकल सायन्स मधून “पीएचडी” असून त्यांनी स्वीडनमध्ये डॉक्टरेट केली त्या देखील उभ्या होत्या.विशेष म्हणजे त्या आदिवासी समाजातील आहेत.डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दांपत्य ८ वर्षे विदेशात होते.त्यांनी स्वीडन सह जपान आदि देशात वास्तव केले आहे.डॉ चित्रा ह्यांना पाच भाषा अवगत आहेत.असे असले तरी ह्या दाम्पत्याने आपल्या मातीतील नाळ कायम घट्ट ठेवली आहे.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित हा त्यांचा श्रद्धा आणि विश्वासाचा विषय आहे.आणि म्हणून त्यांनी बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे विचाराने प्रभावित होऊन दिग्रसवाणी ही देशातील आदर्श आणि वंचित बहूजन आघाडीचा पॅटर्न ठरावी असा चंग बांधून आपल्या उच्च विध्याविभूषित पत्नीला ग्रामपंचायत साठी उभे केले होते.आज त्यांच्या नऊ पैकी आठ जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला.सरपंचपदाची निवडणूक थेट होत नसली तरी वंचितच्या ग्राम विकास आघाडीने डॉ चित्रा कुऱ्हे ह्यांना सरपंच पदाचा उमेदवार जाहीर करूनच प्रचार सुरू केला होता.हे करताना त्यांनी “वंचितांचा वचनानामा” प्रकाशित करून गावच्या विकासाचा रोडमॅप ग्रामस्थान पुढे मांडला आहे.भ्रष्ट्राचार मुक्त ग्रामपंचायत, दारु मुक्त आणि डिजिटल ग्रामपंचायत, सौरऊर्जेचा वापर, मुबलक व स्वच्छ पाणी, आरोग्य, दिवाबत्ती, महिला आरोग्य आणि रोजगार अश्या अनेक मुद्यांना घेऊन राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे संकल्पना असलेल्या ग्रामविकासाची मांडणी केली आहे. प्रचारात देखील विरोधात उभे असलेल्या उमेदवार किंवा पॅनल बद्दल टिका न करता वंचित विकासाचा अजेंडा मांडला जातो.दारू, मटन, पैसा पार्टि हा प्रकार कुठेही होऊ दिला नाही.निवडणूक जाहीर होताच प्रस्थापित राजकीय मंडळींनी आपली मक्तेदारी आणि घराणेशाही म्हणून बौद्ध समूहाला बायकॉट करीत “आम्हाला त्यांची गरज नाही” ही भाषा वापरली होती.त्यामुळे गावातील वंचितचे कार्यकर्ते ह्यांनी पक्षाच्या ग्रामपंचायत निवडणूक लढण्याच्या आदेशाचा धागा धरून ह्या प्रस्थापित ‘खांग्रेसी’ राजकीय वळूंना वठणीवर आणायचा चंग बांधला होता तो आज प्रत्यक्षात उतरला आहे.

डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे ग्राम विकासासाठी एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे मार्गदर्शनात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे हिंगोली जिल्हा मध्ये आदर्श ग्रामपंचायत घडविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावातील विजयासाठी वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने पक्षनेते बाळासाहेब, युवा प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, निरीक्षक अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, महासचिव रविंद्र वाढे ह्यांचे आभार व्यक्त केले. आठ वर्षे जगातील विविध देशात राहिलेल्या फॉरेन रिटर्न, डॉक्टरेट (पोलिटिकल सायन्स मध्ये पीएचडी) असलेल्या आदिवासी समूहाच्या डॉ चित्राताई अनिल कु-हे ह्या सरपंच पदासाठी असल्याने आगामी काळात देशात दिग्रसवाणीचा आदर्श घेतला जाईल , असा आत्मविश्वास डॉ चित्रा ह्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाच्या पीएचडी धारक, फॉरेन रिटर्न महिला ग्रामपंचायत सरपंच पदासाठी देण्याचा विक्रम वंचित बहूजन आघाडीने केला होता त्याची विशेष चर्चा होती.गावातील काही कार्यकर्ते विरोधी पॅनल मध्ये गेल्यावर वंचित च्या पदाधिकारी ह्यांनी दिग्रसवाणी येथे दिनांक १२ जानेवारी रोजी जाहीर सभा गाजवली.त्यात प्रदेश प्रवक्ता तथा युवा महासचिव राजेंद्र पातोडे, वंचित युवा प्रदेश पदाधिकारी तथा हिंगोली जिल्हा युवा निरीक्षक अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, महासचिव रविंद्र वाढे, माजी जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.त्या सभेने अभूतपूर्व प्रतिसाद वाढविला होता. वंचित बहूजन आघाडीचा सरपंच पदासाठी इतकं कॅलिबर असलेला उमेदवार उभे करण्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात हा नवा हिंगोली पॅटर्न यशस्वी झाल्याने बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा राजकीय चमत्कार प्रामुख्याने पुन्हा चर्चेत आला आहे.

पॅनेलचे पुढील उमेदवार निवडून आले, सुभाष खंदारे, सुनीता खंदारे, मिना वसेकर, अनिता आढळकर, उज्वला नायकवाल,साळूबाई पाईकराव, हिम्मत खंदारे.पॅनल विजयी करण्यात सिद्धार्थ खंदारे, रामदास खंदारे, गौतम खंदारे, भास्कर कुटे, विश्वनाथअप्पा साढळकर, शिवप्पा आढळकर, किसनाप्पा जिरवनकर, भारत जिरवनकर (बिल्डर), सुभाष खंदारे, शिवाशांत आढळकर,मनोहर कांबळे, सखाराम खंदारे, राजू वाघमारे, सुनील खंदारे, राहुल खंदारे, सखाराम कांबळे, बबन कांबळे, प्रकाश धबडगे सिद्बोधन खंदारे ह्यानी परिश्रम घेतले.

 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web