राष्ट्रीय मतदार दिना निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी.

सोलापूर -पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

जिल्हा निवडणूक कार्यालय सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .
या निबंध स्पर्धेसाठी निकोप लोकशाहीसाठी निवडणुका, आदर्श आचारसंहिता आणि निवडणुका ,भारतीय निवडणूक आयोग आणि लोकशाही ,बलशाली लोकशाहीसाठी मतदार जागृती ,आदर्श आचारसंहिता आणि निवडणुका हे विषय आहेत.या निबंध स्पर्धेमध्ये विद्यापीठातील विभागातील विद्यार्थी तसेच संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील . या स्पर्धेसाठी मराठी ,हिंदी ,इंग्रजी या तीन भाषांमध्ये निबंध लिहिता येऊ शकतील. शब्दमर्यादा एक हजार शब्दांची आहे. विद्यार्थ्यांनी सदर निबंध 21 जानेवारी 2021 पर्यंत विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाकडे rbchincholar@sus.ac.in या इमेल पत्त्यावर पाठवावेत .तीनही भाषांमधून निबंध लिहिणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना 25 जानेवारी 2021 रोजी सोलापूर शहरात रंग भवन येथे जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येतील . या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.बी.घुटे यांनी केले आहे .
या स्पर्धेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी डॉ. अंबादास भासके मो – 9822883978 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web