अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

प्रतिनिधी.

मुंबई – वांद्रे येथील अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला मास्टर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथालॉजी ऐवजी एम.एस्सी (ऑडिओलॉजी) अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2020-21 पासून एकूण 12 विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह हा अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या महाविद्यालयातील एम.एस्सी (ऑडिओलॉजी) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता केंद्रीय परिषदेने निर्धारीत केल्यानुसार एकूण 12 विद्यार्थी इतकीच राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने ऑडिओलॉजी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web