कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

प्रतिनिधी.

कल्याण – ग्रामपंचायतीच्या निवडणूक ह्या त स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग असतो त्यामुळे निवडणुकीत नेहमीच चुरशीच्या ठरतात कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा १३ सांयकाळी ५ वाजता थंडावल्या आहेत शुक्रवारी ता १५ रोजी  १६८ जागांसाठी मतदान  होणार आहेत  निवडणूक शांततेत पार पडणार असल्याचा मानस निवडणुकी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. 
कल्याण तालुक्यात  २१ ग्रामपंचायतीत २११ जागांवर निवडणूक होणार आहे त्यातील ३३जागा बिनविरोध झाल्या आहेत तब्बल १६८ जागांसाठी प्रशासनाने ८२ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत .१३ बुधवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक प्रचार करण्याचे थांबले आहेत आणि शुक्रवारी ता १५ रोजी सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३०  वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ देण्यात आली आहे तालुक्यात पुरुष मतदार – ३१,१४७ आणि स्त्री मतदार २७,१३७ व इतर १ , मतदान करणार आहेत दरम्यान निवडणूक यंत्रणा सज्ज असून कोणतेही अनुचित प्रकार न करता मतदान शांततेत पडण्याचे आव्हान निवडणूक अधिकारी यांच्या कडून करण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी  यांनी निवडणूकीची तयारी पूर्ण केली आहे  खडक पाडा येथील वायले नगर  मध्ये मुंबई  युनिव्हर्सिटी च्या उप केन्द्रात  १८ तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web