शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत

प्रतिनिधी.

रायगड – शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू/साहसी/दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णय दि. 24 जानेवारी 2020 नुसार निर्गमित केलेले आहे. या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय दि.22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित दिले आहेत. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे यांचेशी संपर्क साधावा. पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना/अभिप्राय dsysdeskI४@gmal.com किंवा desk१४.dsys-mhegov.in या मेलवर दि 22 जानेवारी 2021 रोजी पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web