केडीएमसी कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू

प्रतिनिधी.

कल्याण – राज्य शासनाने 1 जानेवारी 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. सर्वसाधारण सभेने देखील याबाबतचा ठराव पारित केल्यानंतर प्रशासनाने दि.04/12/2020 रोजीच्या पत्रान्वये शासनाकडे सदर प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला आणि शासनाने दि.29/12/2020 रोजी सदर प्रस्तावास मंजूरी देऊन कर्मचा-यांना दि.01/01/2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करणेबाबत तसेच माहे जानेवारी 2021 पासून प्रत्यक्ष वेतनात देणेबाबत कळविले आहे.

त्याअनुषंगाने विद्यमान पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कर्मचा-यांच्या तसेच कर्मचारी संघटनेच्या मागण्यांचा सहानूभूतीपूर्वक विचार करुन 7 वा वेतन आयोग महापालिकेच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच शिक्षण व परिवहन विभागाच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना लागू करून मकर संक्रातीच्या दिवशी गोड बातमी दिल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.

7 वा वेतन आयोग महापालिका अधिकारी/कर्मचा-यांना माहे जानेवारी 2021 च्या फरकासह माहे फेब्रुवारीच्या वेतनात लागू करण्यात येणार असून दि. 01/01/2016 ते 31/12/2020 या कालावधीतील फरकाची रक्कम पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात कार्यरत कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार असून सेवानिवृत्त कर्मचा-यांना 3 वर्षात 3 समान हप्त्यात रोखीने अदा करण्यात येणार आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web