मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्याने मुंबई येथील आजाद मैदान येथे रिपब्लिकन बहुजन विध्यार्थी परिषदेच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी चंद्रशेखर कांबळे म्हणाले की, रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री असताना देखील त्यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने का कपात केली.रामदासजी आठवले दलित नेते असल्याने सुरक्षेच्या बाबतीत ठाकरे सरकार जातीयवाद करत आहे का ? असा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले ज्या ज्या वेळेस बाहेरच्या राज्यात जातात तेव्हा तेथे केंद्रीय मंत्री असल्याने जास्त सुरक्षा दिली जाते परंतु महाराष्ट्र सरकार सुरक्षेत कपात करत आहे.राज्य सरकारने रामदासजी आठवले यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी चेंद्रशेखर कांबळे यांनी केली आहे.
यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात रिपब्लिकन बहुजन विध्यार्थी परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सचिन बनसोडे,मुंबई सरचिटणीस प्रशांत मोरे याच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते