ठाकुर्लीत हॉटेलमधील कुकरचा स्फोटात ग्राहक गंभीर जखमी

प्रतिनिधी.

डोंबिवली – ठाकुर्ली पूर्वेकडील स्टेशनजवळील सौभाग्य न्यू किचन या हॉटेलच्या किचन मंगळवारी मध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅसवर शिजत असलेल्या कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत हॉटेलमध्ये पत्नीसमवेत जेवायला बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर कुकर आदळला. जखमी ग्राहकाला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सचिव सांडभोर यांनी दिली. या घटनेत कलाई सल्वन ( ४०, रा. डोंबिवली ) हे गृहस्थ आपल्या पत्नी समवेत सौभाग्य न्यू किचन या हॉटेलात जेवत होते जेवत असताना किचन मध्ये स्वयंपाकी जेवण बनवत असताना काही कळण्यापूर्वी गॅसवरील कुकरचा स्फोट झाला. कुकर वेगाने उडून समोरच्या टेबलावर जेवत असलेल्या साल्विन यांच्या डोक्यावर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web