कांबा ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र १ मध्ये एकता पॅनल प्रचारात आघाडीवर

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायत कार्यालयातील निवडणूक रंगत  वाढली आहे कांबा ग्रामपंचायत ही मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत उद्योग वाढण्यात मदत करणार असल्याचे प्रतिपादन प्रभाग क्र १ च्या एकता पॅनल च्या उमेदवार सोनाली विजय उबाळे  यांचा निवडणूक चिन्ह गॅस सिंलीडर आणि रंजना दिपक म्हारसे  यांचा कपाट चिन्ह असून प्रचारात आघाडी घेतली आहे आणि महिला राज वार्डात येणार असल्याची खात्री ता .१० रविवारी  निवडणूक प्रचारात व्यक्त केली आहे त्यावेळी वार्डातील शेकडो मतदार सोबत होते 

कल्याण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीतील निवडणूक चूरस वाढत चालली आहे . कांबा गावात एकूण १३ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे . ग्रामपंचायत भागात अनेक उद्योग स्थिरावत आहे त्याला चालना मिळण्यासाठी आणि विकासाला हातभार लागून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत करणार असल्याचे वार्ड क्र .१ च्या उमेदवार सोनाली विजय उबाळे  यांचा निवडणूक चिन्ह गॅस सिंलीडर आणि रंजना दिपक म्हारसे  यांचा कपाट चिन्ह घेऊन निवडणूकीत उभ्या आहेत . स्थानिक मतदारांचा पाठिंबा ही मिळत असल्याचे रविवारी  ता १० सांयकाळी   प्रचारात करीत असताना दोन्ही उमेदवारांनी सांगितले. पाच वर्षांनी निवडणूका येतात मात्र नेहमी अडचणीत धावून येऊन समस्या सोडविणार उमेदवार वार्डात पाहिजे त्यामुळे मतदारांनी यांचा विचार करा आणि  निवडणूक चिन्ह गॅस सिंलीडर आणि  कपाट चिन्ह यावर बटन दाबून विजय करण्याच्या मानस बोलून दाखवला. दरम्यान कांबा गावातील निवडणुकीत प्रचार अंतिम टप्यात आल्याने  प्रसाराची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web