लेखिका प्रिया मेश्राम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी.

मुंबई – नागपूर येथील पियावी पब्लिकेशनच्या प्रकाशक व लेखिका प्रिया मेश्राम या वृत्तपत्रातून गेल्या अनेक दिवसांपासून समाज जागृतीपर लिखाण करीत आहेत.या लिखाणाची दखल घेत मुंबई येथील अभिजीत राणे युथ फाऊंडेशनच्या वतीने लेखिका प्रिया मेश्राम यांना कै.वीर लक्ष्मण आण्णाजी राणे पत्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वृत्तपत्र लेखन पारितोषिक वितरण सोहळा मुंबई येथील केशव गोरे ट्रस्ट हॉल येथे पार पडला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेखिका प्रिया मेश्राम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दै. मुंबई मित्रचे संपादक अनघा राणे,बिग बॉस फेम अनिल थत्ते,अनिल गलगले, माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद शेलार,जेष्ठ राजकीय समीक्षक धडक कामगार युनियन अध्यक्ष अभिजीत राणे आदी मान्यवर उपस्थित होते.लेखिका प्रिया मेश्राम यांना या अगोदर स्टार-FSIA तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘दि रिअल सुपर वुमन-2020’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हिरवे यांनी केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web