अकोला येथील प्रसिद्ध जैन मंदिरास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची सदिच्छा भेट

प्रतिनिधी.

अकोला – भगवान महावीर जैन व भगवान गौतम बुद्ध हे समकालीन महामानव कायम मानवजातीच्या उत्थाना करिता कार्यकरित होते. त्यांच्या विचारांचा वारसा फार मोठा आहे. अकोला येथील जैन बांधवांनी त्यांचा वारसा फार उत्तम प्रकारे चालविला आहे. त्यांच्या विचारावर चालत जैन बांधवांनी मानवसेवेचे कार्य सुरु ठेवले आहे, हे विचार जोपर्यंत कृतीत उतरत नाही, तोपर्यंत कल्याणकारी व्यवस्था निर्माण होत नाही असे प्रतीपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

गांधी रोड चौक, अकोला येथील प्रसिद्ध जैन मंदिरास मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या निमंत्रणावरुन ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी संपूर्ण मंदिर व परिसराची पाहणी केली. तसेच खुप जुनी वैचारिक असलेल्या जैन मंदिर येथील ग्रंथालयाची पाहणी केली. तसेच हे साहित्य आणखी ५०० वर्ष कसे टिकवता येईल. त्यासाठी काही मदत पाहिजे असल्यास ती करेल असे आश्वस्त दिले. सर्व प्रथम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मनी लाखटिया यांनी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे शाल व श्रीफळ देउन स्वागत केले. याप्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मणी लाखटिया, उपाध्यक्ष विशाल शाह, मंत्री राजु भंडारी, सदस्य महेंद्र देडिया, चेतन मेहता, राजु नगरिया, सुरेश दहेता, रजनीकांत शाह, प्रदीप शाह, प्रकाश भंडारी, कोटक शाह, जोनेद भादानी, मेध शाह, भावीश शाह, प्रवीण मोरे, हिमांशु पारेख, वंचीत बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदिप वानखडे, सभापती पांडे गुरुजी, डॉ प्रसन्नजीत गवई, गौतम गवई, पराग गवई, गजानन गवई, उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web