मोहोळ येवती पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेब ठाकरे अमृतवाहिनी  योजना नाव देण्याची मागणी

प्रतिनिधी.

सोलापूर – मोहोळ शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठयाची मागणी खूप वर्षांपासून आहे, त्याची सुरुवात एका महत्वाच्या टप्यावर आहे हा निर्णय ऐतिहासिक व मोहोळ शहर वासीयांना  समाधान देणारा आहे.यामध्ये प्रत्येकाने आप आपल्या परीने पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न केले आहेत.पाणीपुरवठयांची योजना सक्षम पणे राबवून गाव आणि शहरे यांची  पिण्याच्या पाण्याची वणवण थांबावी ही हिंदूहृदय सम्राट वंदनीय श्रीमान स्व बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही आमलात आली होती त्यात हळू हळू योजनेच्या नावात बदल होत गेले आहेत, म्हणून सदर मोहोळ ते येवती च्या पाणीपुरवठा योजनेला हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे अमृत वहिनी योजना असे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांनी नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना केली . याबाबत सविस्तर बोलताना नागेश वनकळसे मोहोळ च्या पाणीप्रश्नासाठी व त्याच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री ,पाणीपुरवठा मंत्री सेनेचे आहेत ज्या नावाने आम्हा शिवसैनिकांना काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सदर योजनेला द्यावे अशी आमची आग्रही मागणी असल्याचे मत श्री वनकळसे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की सदर योजनेबद्दल जे दस्तऐवज होतील व ज्या अधिसूचना निघतील  त्या हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे अमृतवाहिनी मोहोळ येवती   जलयोजना अशा नावाने निघाव्यात अशी मागणी शिवसेनेचे नागेश वनकळसे यांनी नगरविकास मंत्र्यांकडे मुंबई येथे केली .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web