नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांना सन्मान

प्रतिनिधी.

भिवंडी – गोदाम पट्टा येत असलेल्या नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांच्या सेवाकार्याची दाखल घेत वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात घेटे यांचा सन्मान केला.  नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या पट्यात गोदाम भाग जास्त असल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते हि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी घेटे यांनी विशेष मोहीम राबवत याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी केली असून २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात ड्रंक अँड ड्राइव्ह च्या सर्वाधिक केसेस देखील नारपोलीस विभागाने केली असून वर्षभरात सर्वाधिक दंड वसुली केल्याने त्यांच्या या कामाची दाखल वाहतूक विभागाने घेतली असून शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सन्मानपत्र देऊन घेटे यांना गौरविले.  

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web