महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते, कार्याध्यक्षपदी निवृत्ती देसाई यांची नियुक्ती

प्रतिनिधी.

मुंबई – महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची तर कार्याध्यक्षपदी खजिनदार निवृत्तीदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र इंटकच्या कार्यकारिणीतील बदल केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.संजीवा रेड्डी यांच्या मान्यतेने करण्यात आले आहेत.त्या प्रमाणे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी १जानेवारी रोजी वरील प्रमाणे कार्यकारीणीमधील तांतडीने बदल एका पत्राद्वारे जाहीर केले आहेत. लवकरच उर्वरित कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल,असेही जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी वरील नियुक्तीचे स्वागत केले आहे. गोविंदराव मोहिते गेली ४० वर्षे कामगार चळवळीत कार्यरत आहेत.केंद्रीय इंटकच्या टेक्साईल वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे. कामगारांच्या विविध लढ्यात योगदान दिले आहे. महाराष्ट्र इंटक मधील सरचिटणीसपद महत्त्वाचे मानण्यात येते.गोविदराव मोहिते यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनीही संघटनेच्या विविध पदावर कामे केली असून,महाराष्ट्र इंटकमध्ये ते अनेक वर्षे कार्यरत आहेत.निवृत्ती देसाई यांनी गिरणी कामगार चळवळीत आपल्या विविध कामातून आपली ओळख निर्माण केली आहे.इंटकच्या कार्याध्यक्षपदी के.के.नायर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web