रस्त्यावर चिमूकलीला सोडणाऱ्या बापाला नागरीकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी.

कल्याण – पत्नी सोडून गेली. तीन महिन्याच्या चिमुकलीचे पालकत्व कसे करणार या भितीने जन्मदाता बापाने तिला सोडून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र काही नागरीकांनी खलील शेख  नावाच्या या व्यक्तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.नात्याला काळिमा फासणाऱ्या जन्मदात्या बापावर पोलिसांनी गुन्हा डंख केला आहे पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत .दिवसांदिवस नात्यातील संवेदना हरवत चालली आहे , आपल्या दोन महिन्यांच्या कन्येला बेवारस पणे सोडून देत असताना नागरिकांच्या सतर्कतेने जन्म दात्या बापाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे .             

कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड परिसरातील असलेल्या  स्कायवॉकच्या खाली एक व्यक्ती ज्याच्या हातीत लहान मुलगी होती. तो उभा होता. काही वेळानंतर या व्यक्तीने हातातील लहान मुलीला सोडून जात असताना काही तरुणींनी पाहिले. नागरीकांनी त्या व्यक्तिला पकडले. मुलीसोबत त्याला महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात नागरिक घेऊन गेले. पोलिसांनी तपास सुरु केला. या नंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक आहे. कळव्यात राहणा:या खलील शेख याची पत्नी काही दिवसापूर्वी त्याला सोडून कुठे तरी निघून गेली आहे. खलीलला दोन महिने २३ दिवसांची मुलगी आहे. कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांनी सांगितले की, तेजस केंबरे या व्यक्तीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला आहे. पालकत्व लपविण्यासाठी खलील हा प्रकार करीत होता. सद्या त्या मुलीला डोंबिवलीतील जननी आशिष या सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले आहे. खलील शेखला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web