रेल्वे प्रवाशाचा मोबाईल हिसकावाऱ्या चोरट्याला कल्याण जीआरपी ने ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी.

कल्याण – सकाळी साडे 11 वाजण्याच्या विनायक उन्हाळे या प्रवाशाने घाटकोपर स्थानकावरून कसार्याच्या दिशेने जाणारी लोकल पकडली .12 वाजण्याच्या सुमारास लोकल आंबिवली येथे पोहचताच एका चोरट्याने उन्हाळे याचा मोबाईल हिसकावून पळ काढला .उन्हाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला मात्र चोरटा निसटला त्यातच ट्रेन पुन्हा सुरू झाल्याने त्यांनी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तोल गेल्याने ते प्लँटफॉर्म वर पडले सुदैवाने त्यांचा जीव थोडक्यात बचावला .हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे .या प्रकरणी कल्याण जीआरपी ने चोरट्याला सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटवून अटक केली आहे. आशी माहिती पत्रकाराशी बोलताना कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल वाल्मिक यांनी दिली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web