लिफ्टमध्ये अडकलेल्या वृद्ध महिलेची कल्याण अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

प्रतिनिधी.

कल्याण – लिफ्टमध्ये अडकलेल्या 65 वर्षीय महिलेची कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील वोलगा नावाच्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला.
एक 65 वर्षीय महिला बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये अडकून पडल्याची माहिती कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. त्यानूसार अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत काही मिनिटात या महिलेची सुटका केली.
ही महिला लिफ्टमध्ये गेली आणि अचानक लिफ्ट बंद झाली होती. ही महिला लिफ्टमध्ये अडकल्याचे समजताच सोसायटीतील रहिवाशांनी लिफ्ट सुरू करण्याचे आणि या महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते निष्फळ ठरले. विशेष म्हणजे या लिफ्टचे दरवाजेही काही केल्या उघडत नव्हते. त्यामुळे अखेर रहिवाशांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानूसार अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे आणि लिडिंग फायरमन संतोष मोरे, निलेश आडेकर, राहुल भाकरे आदींच्या पथकाने या महिलेची सुखरुप सुटका केली. लिफ्टचा दरवाजा उघडून ही महिला बाहेर आली असता रहिवाशांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला आणि अग्निशमन दलाचे आभार मानले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web